खाल्ल्या ताटात घाण, दहशतवादी हल्ल्यामागे पोलिसाच्या मुलाचा हात | Lokmat News

2021-09-13 5,917

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील सीआरपीएफ च्या कॅम्पवर रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात स्थानिक युवकांचा समावेश होता.त्राल येथे राहणारा १६ वर्षीय दहशतवादी फरदीन अहमद खांदे हा दहावीचा विद्यार्थी होता. विशेष म्हणजे फरदीनचे वडील जम्मू-काश्मीर पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.शनिवारी आणि रविवारच्या दरम्यान रात्री २.३० च्या सुमारास सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ५ जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांचाही खात्मा झाला होता. सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणाले होते की, अचानक असा हल्ला होऊ शकतो, याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आमचे जवान तयार होते. आतापर्यंत दोन दहशतवाद्यां ना यमसदनी पाठवले असून ऑपरेशन अजून चालू आहे, लवकरच ते पूर्ण करू.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires